तर उपाध्यक्षपदी विठ्ठल पटकारे यांची निवड …
मालवण दि प्रतिनिधी
मालवण येथील श्री गणेश नागरी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सौ. सुप्रिया कृष्णा गावकर यांची तर उपाध्यक्षपदी विठ्ठल बाबू पटकारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मालवण येथील श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची ही निवडणूक संस्थापक अध्यक्ष श्री. एम.पी. पाटील व माजी उपाध्यक्षा श्रीमती. उषा तिरोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि निवडणूक अधिकारी श्री. अजय हिर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ही निवड करण्यात आली. यावेळी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. एम.पी. पाटिल यांनी संस्था सुरु केल्यापासून आजपर्यंत संस्थेच्या प्रगतीचा आढावा व सर्वांनी केलेल्या सहकार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून यापुढे ही संस्था कर्मचारी वर्गाच्या प्रामाणिकपणामुळे प्रगतीकडे वाटचाल करील अशी खात्री दिली. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अजय हिर्लेकर यांनी मार्गदर्शन करून यापुढे ही सहकार्य करू असे सांगितले .
यावेळी अध्यक्षा सौ. सुप्रिया गावकर, उपाध्यक्ष श्री. विठ्ठल पटकारे व संचालक श्री. गंगाराम आडकर, श्री. पांडुरंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संचालक श्री. तानाजी खराडे, श्री. प्रताप बागवे, श्रीमती. सुनीता सांब्रेकर, श्री. हर्षल केळुसकर, श्री.लक्ष्मण शिरोडकर, श्री. कैलास साळुंखे, श्री.हेमंत तळवडेकर, श्री. संभाजी कोरे, सौ. जयश्री हडकर व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुचिता धुरी यांनी आभार मानले.
