⚡कणकवली ता.२२-: कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे जागतिक योग दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध योगासाने सादर करून साजरा केला.
केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिक्षिका श्रीमती स्मिता कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील सर्व शिक्षकांसह विद्यर्थ्यांनी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सकाळच्या सत्रात विविध योगासाने प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी जागतिक योग दिनानिमित्त विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. शाळेचे पदवीधर शिक्षक संजय राऊळ ,श्रीम अर्चना तळगावकर,यांसह श्रीम.रुपाली पारकर,श्रीम.रेखा लांघी,श्रीम.अलका मोरे,या शिक्षकांनी योगा प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
