⚡सावंतवाडी ता.२२-: श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी रसायनशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. नॅनो टेक्नॉलॉजी या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ एस ठाकूर यांच्या हस्ते झाल.
याप्रसंगी व्यासपीठावर रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. जी एम शिरोडकर ,पी जी समन्वयक प्रा.डी डी गोडकर , डॉ संतोष हरम पुणे विद्यापीठ हे उपस्थित होते .
‘थिंक बिग विथ स्मॉल थिंग्ज’ नॅनो टेक्नोलॉजीचे ऊर्जा क्षेत्रातील योगदान’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे डॉ संतोष हरम यांनी मार्गदर्शन केले.
सदर चर्चासत्रात नॅनो टेक्नॉलॉजीचे विविध प्रकार त्याची सामाजिक उपयोगिता तसेच विविध औषध निर्मितीमध्ये व ऊर्जास्रोत निर्मितीसाठी कसा उपयोग करता येऊ शकतो हे सविस्तर त्यांनी विशद केले. त्यातही त्यांनी नॅनो टेक्नॉलॉजी वापरून सौरऊर्जा कशी उपयोगात आणली जाऊ शकते याचेही प्रात्यक्षिकासह चलचित्राद्वारे मार्गदर्शन केल.
उपस्थित सर्व सहभागी विद्यार्थी व प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.सदर चर्चासत्रासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ एस एस ठाकूर,पी जी समन्वयक प्रा. डी डी गोडकर यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.जी एम शिरोडकर यांनी केले .प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. यू सी पाटील यांनी करून दिली .सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ यूसी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. जी टी यादव यांनी केले .या कार्यक्रमामध्ये १२० विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला.
