ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांचा शिक्षकभारती सिंधुदुर्ग यांच्यावतीने सत्कार

*💫मालवण दि.१९-:* ओझर विद्यामंदिरचे विद्यमान मुख्याध्यापक सन्मा. श्री. प्रतापराव खोत यांचा त्यांच्या आदर्श व यशस्वी कारकिर्दीबद्दल शिक्षकभारती सिंधुदुर्गच्यावतीने कांदळगाव येथे आयोजित केलेल्या शिक्षकांच्या स्नेहमेळाव्यात शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन नुकताच ह्रद्य सत्कार करण्यात आला. श्री. खोत सर यांनी ओझर विद्यामंदिर येथे क्रीडा शिक्षक म्हणून अनेक वर्षे धुरा सांभाळत अनेक क्रीडा प्रकारांमध्ये विभाग स्तरापर्यंत झेप घेत शाळेला नावलौकीक मिळवून दिला. आपल्या कारकिर्दीत त्यांनी सुयोग्य नियोजन करून शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लावला. अनेक उपक्रमांसाठी शिक्षकांना प्रेरीत करून अनेक क्षेत्रांमध्ये शाळेचा चढता आलेख कायम ठेवला. आजही त्यांनी शाळा, संस्था, विद्यार्थी, पालक यांच्याशी कुटुंबाचं नातं जपलेलं आहे. साधी राहणी आणि सरळ स्वभाव यामुळे त्यांची लोकप्रियता समाजात कायम टिकून आहे. त्यांना शिक्षकभारतीकडून मिळालेल्या सन्मानाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page