⚡देवगड ता.२१-: जागतिक योगादिनाचे औचित्य साधून पंचायत समिती देवगड यांच्यातर्फे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी महिला पंतजली योग समिती देवगड महिला प्रभारी श्रीम . प्रणाली मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली पं.स कर्मचारी यांना योगासनांची प्रात्यक्षिके करून त्यांना योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना महिला पंतजली योग समिती देवगड महिला प्रभारी श्रीम .प्रणाली मराठे म्हणाल्या की कोणत्याही व्याधींपासून दूर राहण्यासाठी योगा करायला हवा. शरीर सुदृढ तर मनही सुदृढ राहते आणि बौद्धिक पातळी उंचावते. त्यामुळे दैनंदिन जीवनात योगाचा अंतर्भाव केल्यास येणाऱ्या कोणत्याही महामारीचा सामना आपण करू शकतो असे त्या म्हणाल्या या कार्यक्रमात पंचायत समिती देवगडचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषी अधिकारी .दिगंबर खराडे यांनी केले तर आभार .विनायक धुरी यांनी मानले.
