नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेती श्रावणी धुरी हीची निवड
*💫कुडाळ दि.१९:-* नॅशनल कबड्डी मॅच गोवा बानवली चर्च मैदान येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये पुरुष व महिला गटांचा समावेश केला होता. ही स्पर्धा १५ ते १७ जानेवारी दरम्यान घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये तेलंगणा,कर्नाटक, महाराष्ट्र,हरियाणा,आंध्र प्रदेश, गुजरात,राज्यांचा समावेश होता. या स्पर्धेत महाराष्ट्राची ५५ खेळाडू सहभागी झाले होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ मुलगे १ मुलगी सहभागी झाली होती. या स्पर्धेमध्ये महिला गटात महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकावला. गोवा येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कुडाळ तालुक्यातील नानेली गावची दत्त स्पोर्ट माणगावची खेळाडू कु.श्रावणी संजय धुरी हिने महाराष्ट्र संघांमध्ये उपकप्तान म्हणून संघातून खेळली श्रावणीने सुवर्णपदक मिळवून यश प्राप्त केले. तसेच नेपाळ येथे होणाऱ्या आतरराष्ट्रीय स्पर्धेत श्रावणी धुरी हिची निवड झाली. हिचे,सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे
