Headlines

आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूलचा १०० टक्के निकाल

⚡सावंतवाडी ता.१७-: नेहमीच आघाडीवर असलेल्या आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल,आरोसचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून प्रथम क्रमांक कु. ऋतुजा मिलिंद जोग (९७ टक्के) हीने मिळविला आहे.

द्वितीय क्रमांक कु.कुणाल विष्णू मुळीक (८९.४०) तर तृतीय क्रमांक कु.गौरी हेमंत मुळीक (८५.६०) हीने पटकाविला आहे. या शाळेतून एकूण ३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के टक्के लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री रोहिदास सावंत, उपाध्यक्ष श्री नीलेश ऊर्फ बाळा परब, सेक्रेटरी श्री राजन नाईक, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री विद्याधर देसाई, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page