⚡सावंतवाडी ता.१४-: श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी आणि देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँण्ड डिझाईन यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला आणि प्रदर्शन व व्यक्तिचित्रण प्रात्यक्षिक कार्यशाळेचे १८ व १९ जुन रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँण्ड डिझाईन चे प्राचार्य रणजित मराठे आणि प्राध्यापक विक्रम परांजपे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले कला प्रदर्शन सकाळी ९:३० ते ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार असून, या मार्गदर्शन शिबिराचा आणि प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर व कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले आहे
