मळगाव येथील शारदा विद्यालय शाळेत उद्या शाळा प्रवेशोत्सव व ‘शाळापूर्व तयारी अभियान मेळावा’

⚡सावंतवाडी ता.१४सहदेव राऊळ-: मळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदा विद्यालय मळगाव या शाळेत उद्या १५ जून रोजी सकाळी १०.३० वाजता शाळा प्रवेशोत्सव-२०२२ व ‘शाळापूर्व तयारी अभियान मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.

या अभियानांतर्गत सकाळी प्रभातफेरी, दीपप्रज्वलन आणि उदघाटन, शाळापूर्व तयारी व विकासपत्र नोंदी, पाठ्यपुस्तक वितरण, पाहुण्यांचे स्वागत, औक्षण समारंभ, गणवेश वाटप आदी कार्यक्रम होणार आहेत. या प्रवेशोत्सव व अभियानास सर्व पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी केले आहे.

You cannot copy content of this page