⚡मालवण ता.१४-: मुंबई विद्यापीठाच्या विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या सहाव्या म्हणजेच अंतिम सत्राचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये मालवण येथील कृ.सी. देसाई शिक्षण मंडळाच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा तृतीय वर्ष विज्ञान विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून, तृतीय वर्ष वाणिज्य विभागाचा निकाल ९६.३० टक्के लागला आहे.
सहाव्या सत्रासाठी वाणिज्य विभागातून ८१ तर विज्ञान विभागातून १५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. तृतीय वर्ष विज्ञान विभागाचा निकाल खालील प्रमाणे: प्राणीशास्त्र विभागातून प्रथम – यथार्थ आनंद खवणेकर (९४%), रसायनशास्त्र विभागातून प्रथम – योगिता संदीप पेडणेकर (९१.८%), भौतिकशास्त्र विभागातून प्रथम – भाग्यश्री जनार्दन मांजरेकर (८१.८%). तृतीय वर्ष वाणिज्य विभागाचा निकाल पुढीलप्रमाणे: प्रथम- मुरलीधर लक्ष्मण भगत (८३%), द्वितीय- कृतिका विलास चव्हाण (७५%), तृतीय- साक्षी शंकर चव्हाण (७३.६७%).
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी, तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत आणि सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
