⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाच्या आज मंगळवारी झालेल्या सभेत जिल्हा पकार संघाच्या कार्यकारीणीवर सदस्य म्हणून वेंगुर्ला तालुक्यातून वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे सदस्य दिपेश परब याची एकमताने निवड करण्यात आली.
वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाची खास सभा आज पत्रकार संघाच्या कार्यालयात संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दाजी नाईक, सचिव अजित राऊळ, सहसचिव विनायक वारंग, खजिनदार एस.एस.धुरी, सदस्य दिपेश परब, सीमा मराठे, प्रथमेश गुरव, अजय गडेकर, सुरज परब, योगेश तांडेल, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य भरत सातोस्कर आदी उपस्थित होते.
या सभेत जिल्हा पत्रकार संघाची दि. २७ जून रोजी होणा-या निवडणूकीची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसिद सावंत यांनी दिली. त्यानुसार जिल्हा पत्रकार संघाच्या निवडणूकीत वेंगुर्ला तालुक्यातून जिल्हा उपाध्यक्ष पदासाठी दाजी नाईक यांनी उमेदवारी अर्ज भरण्याविषयी मत व्यक्त करून तालुका पत्रकार संघाने सहकार्य करावे, अशी विनंती केली. त्यानुसार उपस्थित पत्रकारांनी त्यास पाठींबा दर्शविला. तसेच जिल्हा पत्रकार संघाच्या सदस्यपदी वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाने तालुका कार्यकारिणी निवडीवेळी दिपेश परब यांची सर्वानुमते निवड झालेली होती. त्यानुसार आज सभेमध्ये पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत यांनी त्या निवडीची आठवण करून देत ससर्वांसमोर आणखी कोणी इछूक आहे का? असे विचारले असता सर्वानीच दिपेश परब यांच्या निवडीस एकमताने मान्यता दिली. त्यानुसार दिपेश परब यांची जिल्हा पत्रकार संघाच्या सदस्यपदी निवड झाल्याचे अध्यक्ष प्रदीप सावंत यांनी जाहिर केली.
