श्रीधर नाईक गार्डन लोकार्पण सोहळा पालकमंत्र्यांच्या हस्ते 22 रोजी होणार

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली माहिती

⚡कणकवली ता.१३-: कणकवलीतील गडनदी लगत असलेल्या श्रीधर नाईक उद्यानाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 22 जून रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. यासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांची लोकार्पण सोहळ्यात करिता वेळ देखील घेण्यात आली असल्याची माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

गेली दोन वर्षांहून अधिक काळ हे उद्यान महामार्ग चौपदरीकरणात बाधीत झाल्याने दुरवस्थेच्या स्थितीत होते. त्यानंतर 75 लाख रुपयांचा निधी खर्च करून या उद्यानाचे सुशोभिकरण करण्यात आले. या कामाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. व हा लोकार्पण सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

You cannot copy content of this page