दोन कारमध्ये झाली टक्कर
⚡कणकवली ता.१३-: मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून सकाळी ११ च्या दरम्यान नांदगाव ओटव फाटा ब्रिज जवळील स्नेहल निवास समोर दोन वाहनांची टक्कर झाली असून यात सुदैवाने किरकोळ जखमी पलीकडे कोणत्याही व्यक्तीला गंभीर दुखापती न झाल्याने नांदगाव वासियांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.यात मात्र टाटा कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फॉर्च्यूनर एम.एच.१० डी.एल.७७८६ ही मुंबईहुन कणकवलीच्या दिशेने जात असताना नांदगाव ओटव फाटा ब्रिज जवळील स्नेहल निवास समोर मिडलकट येथे पलीकडे वाहन वळविताना मागाहून येणारी
टाटा ची टी.आय.गो एम.एच.०९ एफ.बी.७०६२ या दोघांत जोरदार धडक बसली .ही धडक एवढी मोठी होती की , टाटाची टीआयगो या कारचे दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच एवढी मोठी धडक होती की, पुन्हा त्या वाहनांची तोंडे फीरली होती .यातील प्रवाशांना मात्र किरकोळ दुखापत झाली आहे.
नांदगाव हायवे संदर्भात सर्व्हिस रोडचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही ओटव फाटा ब्रिज जवळील रस्त्याचा प्रश्न सुटला असला तरी नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रोड चा प्रश्न अद्याप जैसे थे आहे.तसेच नांदगाव परिसरात दिशादर्शक फलक नसल्याने वाहन धारकांना भटकंती करावी लागत आहे.आणि असे अपघात सुध्दा घडत आहेत.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस निरीक्षक जाधव,सोबत जाधव, बुचडे,करवंजे,कमाने,भुतेलो, डिसोझा तसेच कासार्डे पोलिस दुरक्षेत्राचे झोरे आदी तसेच स्थानिक ग्रामस्थ ही मदतीला धावून आले.व महामार्गावरील वाहने बाजूला केली असून दोघांत मिटवून समेट होत आहे.
