पादचाऱ्यांसाठी झाले धोकादायक
⚡सावंतवाडी ता.१३-: येथील मोती तलावाचा फूटपाथ पहिल्याच पावसात खचला आहे, त्यामुळे पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सावंतवाडी आणि शहराचे सौंदर्य असलेला मोती तलावाचा फुटपाथ सारस्वत बँकेच्या समोर खसला आहे. पहिल्याच पावसात हा प्रकार घडला असून अन्य ठिकाणी ही पुटपाथ खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेने वेळीस यावर उपाय योजना करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे
