मळगाव येथील हर्षदा कोंडये हीला त्यागमूर्ती श्रीमती सरस्वती रामचंद्र शेलार सुवर्णपदक प्रदान

⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ-: सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील हर्षदा राजन कोंडये हीला पुणे विद्यापीठाचा विज्ञान शाखेतील सर्वोत्कृष्ट समजला जाणारा त्यागमूर्ती श्रीमती सरस्वती रामचंद्र शेलार सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

हर्षदा ही वनस्पतीशास्त्र विषयात प्राध्यापक रामकृष्ण मोरे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज आकुर्डी पुणे येथे पदव्युत्तर शिक्षण घेत होती. माननीय कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते हर्षदाला हे सुवर्णपदकमा. शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२० व्या भव्य पदवीप्रदान सोहळ्यात प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. भूषण पटवर्धन, डॉ उमराणी, डॉ. प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page