⚡सावंतवाडी ता.१३ विनय वाडकर-: सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीसाठी आज सावंतवाडी नगरपालिकेत प्रांताधिकारी पानवलकर आणि पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत आज नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात पार पडली आहे.
यावेळी प्रभाग क्रमांक 1 ते 8 आणि 10 नंबर प्रभागात सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले असून, प्रभाग क्रमांक 9 मध्ये अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे. या प्रभागात यापूर्वी अनुसूचित जाती साठी महिला आरक्षण होते. यावेळी माजी नगरसेवक तसेच इच्छुक उमेदवारांनी आज आरक्षण सोडतीवेळी हजेरी लावली होती.
