साने गुरुजी वाचन मंदिरात शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम संपन्न

⚡मालवण ता.१०-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिरतर्फे शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. गुरुनाथ ताम्हणकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातील काही उताऱ्यांचे अभिवाचन करण्यात आले. गायत्री गावकर हिने ‘शिवाजी आणि रयत,’ भाग्यलक्ष्मी शिर्सेकर हिने ‘देवळाची लूट, मोडतोड, दर्श सामंत याने शिवाजी आणि धर्म प्रथमेश सामंत याने ‘शिवाजी महाराजांचे ब्राह्मण सहकारी, गुरुनाथ ताम्हणकर यांनी ‘शिवराय’ सम्राट राजे याने आपले कार्य- आपले राज्य’ या निवडक उताऱ्याचे अभिवाचन केले. तर चारुशीला देऊलकर, शिवराज सावंत, स्वाती पारकर यांनी महाराजांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.

अभिवाचकांना पिंटो यांच्या हस्ते पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवरील सर्व पुस्तकांचे तसेच ऐतिहासिक पुस्तकांचे र्शन मांडण्यात आले छोटेखानी ग्रंथप्रदर्शन मांडण्यात आले होते. यावेळी स्वाती पारकर यांनी सेवांगणला शिवस्वराज्य दिनानिमित्त फणसाचं रोप भेट दिले. ते सर्व मान्यवर आणि सेवांगण परिवार यांच्या उपस्थितीत सेवांगणच्या परिसरात लावण्यात आले.

यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष रुजारिओ पिंटो, मनोजकुमार गिरकर, अदिती कुडाळकर, रुचिरा चिंदरकर, विजय कुडाळकर, पंढरी सावंत, प्रिया दूधवडकर, शांभवी कोळगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन संजयकुमार रोगे, सोनाली कांबळी यांनी केली. सूत्रसंचालन ऋतुजा केळकर यांनी केले.

You cannot copy content of this page