विधवा प्रथा बंद करणारी सुकळवाड मालवण तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत…

मालवण दि प्रतिनिधी
अनिष्ट अशी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव ग्रामसभेत करून सुकळवाड ग्रामपंचायतीने सुद्धा पुरोगामी विचारांच्या शृंखलेत स्थान मिळवले आहे. मालवण तालुक्यात सर्वात प्रथम ठराव करून त्याची अंमलबजावणी करणारी सुकळवाड ग्रामपंचायत ही ग्रामपंचायत पहिली ठरली आहे.

सुकळवाड ब्राह्मणदेव मंदिर सभागृहात बहुसंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा सरपंच वैभवी मोरजकर यांचे अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विधवा महिलांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी तसेच पतीच्या निधनानंतर कुंकू पुसणे, अलंकार उतरविणे अशा अनिष्ट प्रथा बंद करणे, हळदीकुंकू, धार्मिक कार्यात ओटी भरणे अशा कार्यक्रमात विधवांना मानसन्मान मिळवून देणे, त्यांची हेटाळणी थांबवणे अशा मुद्द्यांवर चर्चा करून एकमुखाने सर्व ग्रामस्थांनी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव पारित करण्यात आला . सुकळवाड गाव नेहमीच पुरोगामी विचारांचे धोरण राबविणारे गाव आहे. विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव घेऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या या निर्णयाचे गावातील ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

यावेळी उपसरपंच स्वप्नील गावडे, ग्रामसेवक महेंद्र मगम, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुमेधा पाताडे, माजी महिला बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, माजी पंचायत समिती उपसभापती प्रसाद मोरजकर, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव मसुरकर, माजी उपसरपंच सागर कुशे, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पाताडे, वृषाली गरुड, दीपाली गावडे, जयवंती मयेकर, माजी उपसरपंच सुभाष टेंबुलकर, चंद्रसेन पाताडे, सुनील पालकर, किशोर पेडणेकर, रुपेश (नाना) गरुड, भाऊ पाताडे, सुजाता हिंदळेकर, रतन मसुरकर, प्रदीप पाताडे, उमेश पाताडे, शरद पाताडे, सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, महिला बचत गट प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी महिला वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

You cannot copy content of this page