जिल्हा बँकेत नसलो शेतकऱ्याची व्यथा आम्हाला समजते

सतीश सावंत यांनी शेताच्या बांधावर केले बियाण्यांचे वाटप

⚡कणकवली ता.०९-: कणकवली तालुक्यातील जानवली सखलवाडी येथे शेतांच्या बांधावर जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्याहस्ते अंकुर सोनम या भात बियाण्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, जानवली सोसायटी चेअरमन दामोदर सावंत, शाखाप्रमुख सत्यवान राणे, दीपक दळवी, अमोल राणे, शिवराम राणे, विनायक राणे, मारुती राणे, सुभाष मेस्त्री, दीपक दळवी,मिलिंद राणे,दिलीप राणे, शांताराम राणे, किशोर राणे,दिलीप राणे, गंबाजी राणे,धनाजी राणे,प्रशांत राणे,सौ दळवी,सौ सुतार,सौ मेस्त्री, सुनील राणे उपस्थित होते

यावेळी सतीश सावंत म्हणाले, आपण जिल्हा बँकमध्ये नसलो तरी शेतकऱ्यांची व्यथा आपल्याला समजते.त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाच्या आधी पेरणीसाठी भात बियाण्यांच्या आवश्यकता असते म्हणून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रत्येक शेतकऱ्याला भात बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर भाग बियाण्यांचे वाटप केले आहे.शेतकऱ्यानी देखील आधुनिक पद्धतीने शेती करून उत्पादनात वाढ करून आपली प्रगती करावी असे सावंत यांनी सांगितले

यावेळी उपस्थित सखलवाडी येथील शेतकऱ्यांनी सतीश सावंत यांनी भात बियाण्याचे वाटप केल्याबद्दल आभार मानले .सतीश सावंत हे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेतीची आवड आहे. गेल्या वर्षी त्यांनी जायफळ झाडाचे वाटप केले होते. यावर्षी त्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जात शेतकऱ्याची व्यथा जाणून भात बियाण्याचे वाटप केले आहे. त्यामुळे आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही सतीश सावंत यांचे आभार मानतो असे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले

You cannot copy content of this page