गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत कु.शौर्या भूषण सावंत हिचा जिल्ह्यात ९ वा तर राज्यात १४ वा क्रमांक प्राप्त…

⚡दोडामार्ग ता.१७-: गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर आयोजित गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षा (G.T.S.) २०२५-२६ मध्ये दोडामार्ग तालुक्यातील सरगवे गावची कन्या सासोली-हेदुस येथील विद्यार्थी शौर्या भूषण सावंत हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
इयत्ता दुसरीत शिक्षण घेत असलेल्या शौर्याने या परीक्षेत १०० पैकी ७४ गुण (७४%) मिळवत सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर ९ वा क्रमांक आणि महाराष्ट्र राज्यस्तरावर १४ वा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशामुळे शाळा, शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शौर्या ही जि.प. प्राथमिक शाळा, सासोली-हेदुस येथील विद्यार्थी असून, तिच्या मेहनतीला आई सौ.जान्हवी भूषण सावंत, वडील भूषण सुधाकर सावंत यांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला या यशाचे श्रेय दिले जात आहे. लहान वयातच तिने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या यशाबद्दल शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक तसेच ग्रामस्थांनी शौर्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page