आमदार डॉ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शिंदे शिवसेनेचा उपक्रम..
⚡सावंतवाडी ता.१७-: कुडाळ-मालवण मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील अंकूर महिला निवारा केंद्रात शिवसेना शहर महिला आघाडीच्या वतीने फळवाटप तसेच लहान मुलींना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे निवारा केंद्रातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक बांधिलकी जपत महिला आघाडीने हा उपक्रम राबविला.
यावेळी महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत कविटकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, तसेच शिवसेनेच्या जेष्ठ कार्यकर्त्या सुप्रिता धारणकर, शिवानी पाटकर, भारती नाईक, अनघा सावंत, पूजा नाईक, रंजना आंबेरकर, नम्रता वाडकर, क्ष. गुप्ता पडवेकर, कांचन जाधव, संध्या पाटणकर, साधना मोरे आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शहर महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले.
