कॉमर्स शाखेची विद्यार्थिनी श्रावणी मोहन नारकर प्रथम
⚡कणकवली ता०८-: महाराष्ट्र् राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ कोकण विभागाचा इयत्ता १२वी चा निकाल ऑनलाईन जाहीर झाला असून खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित उद्योगश्री प्र.ल.पाटील आर्टस्,कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज खारेपाटण द्विस्तरिय व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल १०० % लागला असून कॉमर्स शाखेची विद्यार्थिनी कुमारी श्रावणी मोहन नारकर या विद्यार्थिनीने ८८.३३ % गुण मिळवत खारेपाटण ज्युनिअर कॉलेज मध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला.
खारेपाटण ज्युनिअर कॉलेजचे एकूण २९५ विद्यार्थी १२ वी च्या परीक्षेला बसले होते.हे सर्वच च्या सर्व विद्यार्थी पास झाले.खारेपाटण कॉलेजच्या इतिहासात प्रथमच आज यावर्षी कला,वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांचा एकाच वेळी १००% निकाल लागल्यामुळे खारेपाटण दशक्रोशीत आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तर द्विस्तरिय व्यवसाय अभ्यास क्रम या विभागाचा ९४.८२ % एवढा निकाल लागला आहे. खारेपाटण कॉलेजचे शाखानिहाय अनुक्रमे उत्तीर्ण झालेले विदयार्थी व शाखा निकाल पुढील प्रमाणे —
सायन्स विभाग – प्रथम – कु.ईफराह शरीफ काझी (गुण – ५०५)८४.१७%, द्वितीय- अविनाश लक्ष्मण खांडेकर व कु.समृद्धी हरीचंद्र हरयाण(गुण – ४९९) ८३.१७%, तृतीय – कु.फरहीन परवेज पटेल (गुण – ४९३) ८२.१७%.
कॉमर्स विभाग – प्रथम – कु. श्रावणी मोहन नारकर (गुण – ५३०) ८८.३३%, द्वितीय- प्रसाद पांडुरंग पांचाळ व कु.दीक्षा दिगंबर हरयाण (गुण – ४९०) ८१.६७%, तृतीय – स्मितेश संतोष पाष्टे (गुण – ४७७) ७९.५०%.
आर्टस विभाग – प्रथम – कु. श्रावणी दिलीप माने (गुण – ४८७)८१.१७%, द्वितीय – परेश सुनील तांबे (गुण – ४५१)७५.१७%, तृतीय- नाहीद हिदायत अत्तार (गुण – ४४६)७४.३३%.
द्विस्तरिय व्यवसाय अभ्यासक्रम
इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी – प्रथम – शुभम अनिल कणेरे (गुण – ३७७)६२.८३%, ऑटो इंजिनिरिंग टेक्नोलॉजी – प्रथम – ओंमकार अनंत पवार (गुण – ४०३) ६७.१७%, अकौंटसी अँड औडिटिंग – प्रथम – कु.वैष्णवी शशिकांत बंदरकर (गुण – ४६३)७७.१७%.
सर्व उत्तीर्ण व गुणवंत विद्यर्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे,उपाद्यक्ष दादा कर्ले,सचिव – महेश कोळसुलकर, खजिनदार संदेश धुमाळे तसेच सर्व संचालक मंडळ सदस्य यासनी अभिनंदन केले असून खारेपाटण हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्यधापक प्रा.संजय सानप व खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.