⚡कणकवली ता.१८-: कोष्टीवाडी मित्र मंडळ, वरवडे (रजि.) यांच्या वतीने वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे हे सलग दुसरे वर्ष असून गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.
शिबिराचा शुभारंभ प्रास्ताविकानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. या रक्तदान शिबिरात एक महिला रक्तदात्यासह एकूण ३६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक सेवेत मोलाचा वाटा उचलला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष विजय कडुलकर, उपाध्यक्ष प्रशांत सावंत, सचिव संदीप राणे, खजिनदार दर्शन पोयेकर, सहसचिव तेजस पोयेकर तसेच धनंजय सावंत, शरद लाड, नरेंद्र कांबळी, स्वप्निल सावंत, तुषार बुचडे, रविराज कांबळी, अक्षय पोयेकर, दिपक पोयेकर, सुभाष सावंत, प्रभाकर बुचडे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. तसेच ओरोस रक्तपेढीचे डॉक्टर आणि वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यतत्पर सदस्य शरद लाड यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.
रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा रक्तपेढी व मंडळाच्या वतीने प्रमाणपत्र, विशेष भेटवस्तू, गुलाब पुष्प व बुके देऊन सन्मान करण्यात आला.
या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे मंडळाचे उपाध्यक्ष प्रशांत सावंत यांनी २० दर्जेदार बॅटऱ्या पुरस्कृत केल्या. तसेच मंडळाच्या माध्यमातून रक्तदात्यांना बॅटरी भेटवस्तू देण्यात आल्या.
