कणकवलीत मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी…

⚡कणकवली ता.१८-: रंगपंचमीचा सण कणकवली शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी एकत्र येत रंगांची उधळण करत सणाचा आनंद लुटला. शहरातील विविध भागांत सकाळपासूनच रंगपंचमीची धूम पाहायला मिळाली. मित्रमंडळी व कुटुंबीय एकत्र जमून एकमेकांना रंग लावत आनंद व्यक्त करत होते.

रंग, गुलाल आणि पिचकारीच्या सहाय्याने लहानग्यांनी विशेष मजा केली. काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या, फवारे यांचा वापर करून जल्लोष वाढवण्यात आला. ढोल – ताशांच्या गजरात तरुणाईने नृत्य करत सण साजरा केला. अनेक ठिकाणी डीजेच्या तालावरही रंगपंचमीची धूम रंगली. महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत सणाचा आनंद द्विगुणित केला.

सणाच्या पार्श्वभूमीवर काही स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी पर्यावरणपूरक रंगांचा वापर करण्याचे आवाहन केले. तसेच सुरक्षिततेची काळजी घेत सण साजरा करण्यावर भर देण्यात आला. एकूणच कणकवलीत रंगपंचमी उत्साह, आनंद आणि एकात्मतेच्या वातावरणात साजरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

You cannot copy content of this page