⚡कणकवली ता.१८-: श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त प्रेमदया प्रतिष्ठान मुंबई व श्री स्वामी समर्थ मठ कळसुली, हर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. स्वामी समर्थ मठ, कळसुली-हर्डी येथे शुक्रवार २० मार्च रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
पहाटे ४ वा. काकड आरती, सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत पुण्याहवाचन, अभिषेक, होम-हवन व स्वामींच्या पादुकांचे पूजन होणार आहे. ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद, दुपारी ३ वा. श्री स्वामी समर्थ चरित्राचे सामूहिक पठण, ३.३० ते ५.३० या वेळेत लहान मुलांचे सांस्कृतिक व नृत्य कार्यक्रम होतील. सायंकाळी ६ वा. पालखी मिरवणूक, ७ वा. हरिपाठ, रात्री ८ वा.ह.भ.प. बुवा विजय सुतार (घोणसरी) यांचे सुश्राव्य कीर्तन, रात्री ९ वा. स्थानिकांना भजनांचा कार्यक्रम होणार आहे. या उत्सवाला स्वामी भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रेमदया प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी केले आहे.
