⚡सिंधुदुर्ग दि.१८-: जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलास प्राप्त झालेल्या नवीन वाहनांचे हस्तांतरण सोहळा गुरुवार १९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश नारायण राणे यांच्या शुभहस्ते कार्यक्रम पार पडणार असून, विशेष अतिथी म्हणून गृह राज्य मंत्री (ग्रामीण) ना. डॉ. पंकज भोयर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी विशेष निमंत्रित म्हणून खासदार नारायण राणे, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे व ज्ञानेश्वर म्हात्रे, तसेच आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांची उपस्थिती राहणार आहेत. याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत हे देखील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांनी केले आहे.
