⚡मालवण ता.१८-:
मालवण दांडी येथील बाल दांडेश्वर मंडळाचा ५० वा वर्धापन दिन दि. २७ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
यानिमित्त दि. २७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता श्रींची मिरवणूक (आवारवाडी ते बाल दांडेश्वर मंडळाच्या मांगरीपर्यंत), दि. २८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता दांडेश्वर मंदिरात अभिषेक, सायं. ४ वाजता मंडळाच्या मांगरीत सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ६ वाजल्यापासून तीर्थप्रसाद, महाप्रसाद आणि भजन, रात्री १० वाजता झालझुल दशावतार नाट्यमंडळ यांचा रामदर्शन हा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. दि. २९ मार्च रोजी बालदांडेश्वर मंडळ दांडी यांचा ट्रिकसिन युक्त नाट्यप्रयोग ‘भौमासुर’ सादर होणार आहे. दि. ३० मार्च रोजी रात्री १० वाजता नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर प्रायोजित चिमणीपाखर अकॅडमी कुडाळ यांचा ‘जलवा’ कार्यक्रम सादर होणार आहे. दि. ३१ मार्च रोजी बालदांडेश्वर मंडळातील उभरत्या कलाकारांचा ‘तिरुपती बालाजी’ नाट्यप्रयोग होणार आहे.
दि. १ एप्रिल रोजी बालदांडेश्वर महिला मंडळ प्रायोजित चित्रपट, दि. २ एप्रिल रोजी बालदांडेश्वर मंडळ सदस्य ऋग्वेद आचरेकर प्रायोजित चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तर ३ एप्रिल रोजी नगरसेवक महेश कोयंडे प्रायोजित सातेरी महिला दशावतार मंडळ, पावशी यांचा भक्तांची पाठीराखी आदिमाया नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
