भाजपा महिला मोर्चाच्या वतीने क्रीडा क्षेत्रातील महिलांचा सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.१८-: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला येथे भाजपा महिला मोर्चाच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या निर्मला ओतारी, डॉ.दिपाली पालयेकर, रेश्मा ढोकरे आणि स्मिता गावडे या महिलांचा सन्मान करण्यात आला.यावेळी भाजपाच्या जिल्हा महिला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर, शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, सारिका काळसेकर, रसिका मठकर, हसिनाबेन मकानदार, अंकिता देसाई, नगरसेवक आकांक्षा परब, शितल आंगचेकर, काजल कुबल, गौरी माईणकर, डॉ.अपशान कौरी, डॉ.सई लिंगवत, डॉ. श्रेया सावंत आदी उपस्थित होत्या. प्रास्ताविक वृंदा गवंडळकर यांनी व श्रेया मयेकर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page