⚡बांदा दि.०८-: आरोस विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा बारावीचा निकाल 100 टक्के लागला आहे.
लवू कांता शेळके 80 टक्के गुण मिळवून प्रथम, अंकुश कांता शेळके 78.56 टक्के गुण मिळवून व्दितीय तर मीनाक्षी कृष्णा माणगावकरने 78 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला सर्व यशस्वी विद्यार्थ्यी व मार्गदर्शक शिक्षकांचे आरोस शिक्षण मंडळाचे अध्यक्ष निलेश उर्फ बाळा परब, संस्था पदाधिकारी, प्रभारी मुख्याध्यापक सदाशिव धुपकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे