राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा १२ वीचा निकाल ९९.६६ टक्के…

⚡सावंतवाडी ता.०८-विनय वाडकर: महाराष्ट्रात आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून, सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चा निकाल ९९.६६ टक्के लागला आहे. राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधून एकूण ९२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यामध्ये सायन्स विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून, २९० पैकी २९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये गुडेकर दीक्षा राजेश हिने ८९.०० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक देसाई युगा विष्णू हिने ८८.५० टक्के, तृतीय क्रमांक मांजरेकर सिध्दी रामचंद्र हिने ८७.५० टक्के. तर कॉमर्स विभागाचा निकाल ९९.२५ टक्के लागला असून, ४०५ पैकी ४०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक कोरगावकर गायत्री सुजित ९५.१७ टक्के, द्वितीय क्रमांक माळकर मानसी रघुनंदन ९३.३३ टक्के, तृतीय क्रमांक सामंत दर्शन दिगंबर ९२.८३ टक्के, तसेच कला विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून, २०१ पैकी २०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक डेगवेकर वैष्णवी श्रीपाद ९३.८३ टक्के, द्वितीय क्रमांक प्रभू ईशा चंद्रशेखर ९०.६७ टक्के, तृतीय क्रमांक शिरोडकर यशदा शरद ९०.३३ टक्के मिळवून यश प्राप्त केले आहे. तसेच कॉमर्सच्या माळकर मानसी रघुनंदन या विद्यार्थिनीला अकाउंटन्सी विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत तर गावडे श्रावणी गोविंद या विद्यार्थिनीने माहिती तंत्रज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत.

तसेच कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून, १८ पैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक भिकाजी राजन केदार ८३.६७ टक्के, द्वितीय क्रमांक सावंत न्हानु मोहन ८१.३३ टक्के, तृतीय क्रमांक दाभोलकर अनिकेत संजय ७३.८३ टक्के, तर मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून, १३ विद्यार्थ्यांपैकी १३ ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक परब ओजस विनायक ८१.६७ टक्के, द्वितीय क्रमांक गावडे अक्षता सीताराम ७५.३३ टक्के, तृतीय क्रमांक शेख सना इम्तिहाज ७५.१७ टक्के यांनी पटकावला आहे.

यशस्वी सर्व विद्यार्थाचे प्रशालेच्या वतीने संस्थाध्यक्ष विकासभाई सावंत, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री धोंड सर, उपप्राचार्य नाईक मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यानी अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page