उत्कर्ष मगदूम प्रथम
⚡आंबोली ता.०८-: आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचा एच एस सी बोर्ड चा निकाल 100 % लागला यात विज्ञान शाखेत प्रथम उत्कर्ष महेश मगदुम ९२.३३% द्वितीय आदित्य संजिव रेड्डडी ९१.३३%. तृतीय आर्यन अरुण शिरसाट ९१.००% गुण मिळवत यश संपादन केले शाळेतील एकूण ३८ विद्यार्थ्यांपैकी ३८ विद्यार्थी विशेष श्रेणी उत्तीर्ण झाले ११ व्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पी एफ डॉट्स, सचिव सुनिल राऊळ प्राचार्य सुरेश गावडे सर्व संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे