*💫कणकवली दि.१८-:* तोंडवली-बावशी ग्रामपंचायतीत भाजपाचे कमळ अखेर फुलले आहे. पहिल्या मतमोजनीअखेर भाजपाचे ५ पैकी ४ सदस्य निवडून आले आहेत. तोंडवली बावशी ग्रा पं मतमोजणीला प्रभाग १ आणि प्रभाग २ च्या मतमोजणीला सुरुवात झाली. तोंडवली बावशी ग्रा पं मध्ये ने खाते खोलले आहे. प्रभाग १ मध्ये २ जागांसाठी तर प्रभाग २ मधील ३ जागांसाठी मतमोजणी झाली.प्रभाग १ मधून भाजपाचे दिनेश कांडर विजयी झाले आहेत. प्रभाग २ मधून भाजपाचे गौरवी बोभाटे, मनाली गुरव, रवींद्र बोभाटे विजयी झाले. भाजपाचे जि प सदस्य संजय देसाई यांनी तोंडवली बावशी मध्ये भाजपाची सत्ता आणण्यासाठी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह जीवतोड मेहनत घेतली आहे. भाजपा उपजिल्हाध्यक्ष राजन चिके, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, असलदे सरपंच तथा भाजपा तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, शक्तिकेंद्रप्रमुख रविराज मोरजकर आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीला फळ आले असून तोंडवली – बावशी वर भाजपाचा झेंडस फडकला आहे.
*तोंडवळी बावशी ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व*
