मालवणच्या दुसऱ्या कन्येनेही दाखविले मुंबई उपनगरात कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे धाडस…!

कोरोना योद्धा डॉ जॉयलीन नरोना यांचे सर्वत्र कौतुक_*

मालवण दि प्रतिनिधी महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसीचा शुभारंभ काल सर्वत्र झाल्यानंतर मुंबई प्रमाणेच मुंबई उपनगरातही मालवण शहरातील डॉ. जॉयलीन जॉन नऱ्होण यांनी कांदिवली येथील शताब्दी हॉस्पिटलमध्ये ही लस घेऊन मालवणच्या नावलौकिकात आणखी एक मानाचा तुरा खोवला मूळ मालवण मेढा येथील डॉ. जॉयलीन जॉन नऱ्होना ही मच्छिमार नेते आणि माजी नगरसेवक जॉन नऱ्होना यांची मुलगी आहे डॉ जॉयलीन यांनी २०१७ साली कणकवली येथे एक वर्षाची आरोग्य सेवा बजावल्यानंतर त्या २०१८ सालपासून त्या मुंबई मिरारोड येथे आरोग्य सेवा बजावत आहेत. डॉ. जॉयलीन नऱ्होना या जून 2020 पासून केतकी पाडा हेल्थ पोष्ट दहिसर येथे असिस्टंट मेडिकल ऑफिसर म्हणून कोरोना रुग्णाची सेवा बजावत असून काल महाराष्ट्रासह देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीचा शुभारंभ पार पडला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील एम. एम. आर. डी. मैदानावरील बिकेसी कोविड सेंटरमध्ये मालवणच्या मधुरा अवसरे पाटील यांना लस देऊन शुभारंभ केल्यानंतर मुंबई उपनगरातही मालवणच्या जॉयलीन जॉन नऱ्होना या युवतीने कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. डॉ. नऱ्होना हिला कांदिवलीच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये लस देण्यात आली. याबाबत बोलताना डॉ. जॉयलीन म्हणाल्या, शासनाने आरोग्य विभागात काम करणाऱ्या प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्याचे सांगितले होते. मी गेली आठ महिने कोरोना रुग्णांची सेवा बजावत असल्याने शासनाच्या ध्येय धोरणानुसार कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्याबाबत मी उत्सुक होते त्यानुसार मी लस घेतली असून मला कोणताही त्रास झालेला नाही सर्वांनी ही लस टोचून घेण्याचे आवाहन डॉ. जॉयलीन नऱ्होना यांनी केले आहे.

You cannot copy content of this page