ओरोस ता.०१-:* निर्भय भारत बनविण्याचे मोदींचे स्वप्न आपण पूर्ण करूया. तसेच डिजिटल इंडिया स्वप्न पूर्ण करून बदलत्या काळामध्ये भारत मागे राहू नये अशा पद्धतीने मोदी सरकार काम करत आहे असे, प्रतिपादन भाजप खा मनोज कोटक यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुसंवाद कार्यक्रमात किर्लोस कृषी विज्ञान केंद्र आयोजित थेट प्रक्षेपण वेळी बोलताना केले.
केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विविध शासकीय योजनेचे लाभार्थी व शेतकरी यांच्याशी सुसंवाद कार्यक्रम व गरीब कल्याण संमेलन हिमाचल प्रदेश सिमला येथे साजरा झाला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्र किर्लोस द्वारे येथील कृषी महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार मनोज कोटक उपस्थित होते. यावेळी माजी आम राजन तेली सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, कसाल शिक्षण संस्थेचे संचालक प्रभाकर सावंत, तहसीलदार अमोल फाटक, कृषी प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र सावंत आदी उपस्थित होते.
या खा कोटक यांनी केंद्राच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी चर्चा केली. तसेच त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित लाभार्थ्यांशी चर्चा करून विविध योजनांची माहिती घेतली. मानव निर्मित अडचणीवर मात करण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याने ऑनलाइन काम करणे काळाची गरज आहे, असे ते म्हणाले यावेळी राजन तेली यांनी मार्गदर्शन केले. शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळण्यासाठी आम्ही काम करत आहोत असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.
