ओसरगाव तलावाच्या सुशोभीकरणासाठी उपोषण सुरू

सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच बबली राणे यांचे आमरण उपोषण काल मध्यरात्रीपासून सुरू*

*💫कणकवली दि.१६-:* प्राण जाए ….पर शान ना जाए चा नारा देत कणकवली तालुक्यातील ओसरगाव तलावाच्या सुशोभिकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच बबली राणे यांनी १५ जानेवारीपासून मध्यरात्री १२ वाजलेपासून तलावकिनारी आमरण उपोषण छेडले आहे. मागण्या तडीस जाण्यासाठी ठोस कारवाई करा अन्यथा आज १६ जानेवारी रोजी स्वतःच्या वाढदिवसादिवशीच ओसरगाव तलावात जलसमाधी घेण्याचा निर्वाणीचा इशारा बबली राणे यांनी दिला होता. तलाव लिकेज, नानानानी पार्क, जॉगिंग पार्क, उपहारगृह, पर्यटकांसाठी एक्सचेंज रूम, हायमास्ट व चारही बाजूने पथदीप, पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंट बनवून ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करावे. राष्ट्रीय महामार्गापासून परबवाडी, अपराजवाडी, बौद्धवाडी, गावठाणवाडी, मळीवाडी, सडेवाडी, लिंगमाऊली मंदीराकडे ओसरगाव तलावाकडून जाणारा रस्ता तयार करावा या मागणीसाठी बबली राणे यांनी आमरण उपोषण छेडत जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली पं स सभापती मनोज रावराणे,पं स सदस्य प्रकाश पारकर, ओसरगाव मतदारसंघाचे पं स सदस्य मिलिंद मेस्त्री यांनी लघुपाटबंधारे उपविभाग कणकवली चे उपअभियंता पी आर पाटील, कनिष्ठ अभियंता बशीर तरटे, स्थापत्य अभीयांत्रिकी सहाय्यक व्ही पी लिंगरज यांच्यासह उपोषणस्थळी जात बबली राणे यांची भेट घेतली. सभापती रावराणे यांनी ओसरगाव धरणाच्या अधोबाजूस असलेल्या सांडव्याच्या पलीकडील वाडींतील नागरिकांना येजा करण्यासाठी ह्युम पाईप कॉजवे बांधकाम व संरक्षक भिंत बांधण्यासाठी ५९ . २४ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून निविदा प्रक्रिया सुरू आहे. तलाव लिकेज साठी प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला जाईल. रस्ता कामासाठी १० लाखांचे टेंडर लावण्यात आले आहे. यासाठी आवश्यक नाहरकत खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून देण्यात येतील असे सांगत सभापती रावराणे यांनी उपोषण मागे घेण्याबाबत चर्चा केली. सभापती रावराणे यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चा झाल्यानंतर बबली राणे यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांशी चर्चा केल्यानंतर उपोषण मागे घेण्याबाबत निर्णय घेण्याचा निर्णय घेऊ असे बबली राणे यांनी सांगितले. यावेळी माजी ग्रा पं उपसरपंच प्रदीप तळेकर,माजी सदस्य सुदर्शन नाईक, सुनील नाईक, राहुल आंगणे, अमोल गावडे, राजू रोडये, नंदू गावडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page