रेवतळे येथील महालक्ष्मी मंदिरात उद्यापासून कार्यक्रम

मालवण ता.२०-:* समस्त मांजरेकर परिवाराची कुलस्वामिनी महालक्ष्मी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव व वार्षिक कुलस्थापना दिनानिमित्त दि. २१ ते २६ मे या कालावधीत मालवण रेवतळे येथील महालक्ष्मी मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२१ रोजी सकाळी ९ ते ३ पर्यंत महालक्ष्मी देवीचा वार्षिक कुलस्थापना दिन, देवीची पूजा, होमहवन व महाप्रसाद, रात्री ९ वा. समस्त मांजरेकर बंधूंचे भजन. २४ रोजी सकाळी ७.३० वा. देवीची पूजा, १० वा. सात कुमारिकांची लाह्याने ओटी भरणे, ११ वा. धार्मिक कार्यक्रम, ६ वा. पाचं घरात जोगवा मागणे आणि तळी घेणाऱ्यांची ओटी भरणे, ८.३० वा. महालक्ष्मी देवीचा मांड मांडणे कार्यक्रम, रात्री ९ वा. मशाल पेटविणे, नंतर दिवटीवर समस्त मांजरेकर बंधू आणि भाविकांनी तेल घालण्याचा कार्यक्रम, ९.३० वा. महालक्ष्मी देवीला प्रसाद दाखवून महाप्रसादाचा कार्यक्रम, ११ ते पहाटे ३ पर्यंत महालक्ष्मी देवीच्या गोंधळासंबंधी कथा, तसरीब खूणेचा कार्यक्रम, पहाटे ५ वा. दिवटी विसर्जन आणि कार्यक्रम समाप्त. दि. २६ रोजी दुपारी शुद्धिकरण होम आणि महाप्रसाद होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त मांजरेकर बंधू व परिवाराने केले आहे.

You cannot copy content of this page