बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे दोन कारची समोरा समोर धडक…

सहा जण जख्मी; उपचारासाठी गोवा इथे हलविले…

दोडामार्ग ता.२०-:* दोडामार्ग ते विजघर कोल्हापूर मार्गावर झरेबांबर विमानतळ येथे रस्त्यावर पडलेली खडी बांधकाम विभाग यांना कळवून देखील ती वेळीच बाजूला केली नाही.बांधकाम विभाग तसेच डंपर चालक यांच्या निष्काळजी पणामुळे शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर पडलेली खडी यातच दुसऱ्या गाडीला साईड घेण्याच्या नादात दोन कारची समोरा समोर धडक बसून सहा जण जखमी झाले.यात एका गरोदर महिलेसह तीन महिला जखमी झाल्या दोन महिन्यांचे बाळ सुखरुप बचावले आहे. जखमीना दोडामार्ग रूग्णालयात दाखल करुन प्राथमिक उपचार करुन गोवा येथे हलविले.

You cannot copy content of this page