Headlines

वेंगुर्ला ठाकरे शिवसेना नवरात्रोत्सव कमिटी अध्यक्षपदी विजय नाईक यांची निवड…

उपाध्यक्षपदी प्रकाश गडेकर व संजय गावडे यांची निवड..

⚡वेंगुर्ला ता.२९-: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष वेंगुर्ला सार्वजनिक नवरात्रोत्सव 2026 च्या आयोजनासाठी पक्षाची बैठक ठाकरे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय वेंगुर्ला येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये नवरात्रोत्सव कमिटी 2026 स्थापना करण्यात आली. या कमिटीच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य विजय वासुदेव नाईक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी उभादांडा जि. प. सदस्य संजय दत्ताराम गावडे व उपजिल्हाप्रमुख प्रकाश महादेव गडेकर यांची निवड करण्यात आली. सचिवपदी शैलेश परुळेकर व
खजिनदारपदी सुमन हरिश्चंद्र कामत यांची निवड करण्यात आली. कमिटी सदस्य, सल्लागार, विविध पदाधिकारी यांचीही निवड यावेळी करण्यात आली.
या बैठकीला तालुक्यातील माजी उभादांडा जिल्हा परिषद सदस्या
सुकन्या नरसुले, साक्षी चमणकर , गजानन गोलतकर, गजानन मेस्त्री, ओंकार पंडित,कोमल सरमळकर, अपेक्षा बागायतकर, राधिका मोचेमाडकर, वैभव फटजी डेलीन डिसोजा, संदीप केळजी, सुहास मेस्त्री,
अल्पसंख्यांक सेलचे रफिक बेग, सुजित चमणकर, अभिनय मांजरेकर, लक्ष्मी पेडणेकर सचिन मांजरेकर, सुरेश वराडकर, आनंद वेंगुर्लेकर,
शाखाप्रमुख अभिमन्यू भुते,
श्री. गावडे, नयन आजगावकर, लवू तेरसे आदी व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page