*💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत घंटानाद आंदोलन अखेर ६५ व्या दिवशी स्थगित करण्यात आले. आज दुपारी दोन वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार मा. विनायक राऊत आले. त्यांच्या सोबत कुडाळ विधानसभा सदस्य मा. वैभव नाईक ही होते. त्यांनी दिनांक १७ जानेवारी रोजी आपल्या बंगल्यावर बोलावले आहे. यावेळी झालेल्या चर्चेअंती त्यांनी केलेल्या आंदोलन स्थगितीबाबत विनंती नुसार तोपर्यंत आंदोलन स्थगित ठेवले आहे. सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. अन्यथा सोमवारपासून न्याय मिळेपर्यंत पुन्हा आंदोलन सुरू ठेवण्याचा पर्याय आहे, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत घंटानाद आंदोलन अखेर ६५ व्या दिवशी स्थगित
