कणकवली ता.१९-:* नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रोडचे काम अर्धवट ठेवून महामार्ग प्राधिकरणाने प्रवाशांना मृत्यूचे आमंत्रण दिले आहे.यासंदर्भात भाजपा आमदार नितेश राणे यांनी नांदगाव येथे भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. काल दुपारी कणकवली प्रांत कार्यालय येथे अधिकाऱ्यांची भेट घेतली होती व नांदगाव तिठा येथील प्रलंबित कामांबाबत चर्चा करुन आज प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जाहीर केले होते.
या पार्श्वभूमीवर सकाळी १० वा. नांदगाव येथे आम.नितेश राणे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी हायवे अधिकारी यांना ज्या काही मागण्या नांदगाव वासियांच्या आहेत त्या तातडीने मार्गी लावा.छोट्या छोट्या समस्या सोडविण्यासाठी दिरंगाई नको त्या तातडीने मार्गी लावा .अशा सुचना आमदार नितेश राणेंनी संबंधित अधिकारी यांना दिल्या आहेत.
यावेळी महामार्ग प्राधिकरणचे कनिष्ठ अभियंता श्री. जाधव,केसीसी चे पांडे,उप अभियंता श्री कुमावत,केसीसी ठेकेदार कंपनी अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक श्री हुलावले,इंकपाळ ,बावधने तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर,असलदे उपसरपंच संतोष परब, भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, कमलेश पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, भुषण म्हसकर ,भुपेश मोरजकर, आदी उपस्थित होते. भेट देऊन कोणकोणती कामे करावयाची आणि पावसाळ्या पूर्वी कोणती कामे तातडीने पूर्ण करायची याबाबतच्या सूचना आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना प्रत्यक्षच दिल्या आहेत .
तसेच हायवे संदर्भात गतिरोधक बसविण्याची मागणी नसताना गतिरोधक का बसविण्यात आले. याबाबत कोणी लेखी मागणी केली आहे ती आम्हाला दाखवा उगाच आमच्या नावाची बदनामी करु नका अशी आक्रमक भूमिका असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी व्यक्त केली यावर अधिकारी वर्ग निरुत्तर झाले होते. नांदगाव ब्रिज शेजारून जाणारा सर्विस रोड पूर्ण होत नाही तोपर्यंत श्री देव कोळंबा येथे मिडलकट ठेवून पर्यायी मार्ग द्यावा. ही मागणी तात्काळ करण्यात यावी अशा सूचना आमदार नितेश राणेंनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.
