कणकवली गांगोमंदिर नजीक रस्त्यावर ऑईल पडल्याने दुचाकीस्वारांचा अपघात

कणकवली ता.१९-:* कणकवली शहरात गंगो मंदिर ते जानवली ब्रिज पर्यतच्या सर्विस रस्त्यावर एका जेसीबीचे ऑइल सांडल्याने याठिकाणी ह्या निसरड्या रस्त्यावरून दोन दुचाकीस्वार पडून त्यांना दुखापत झाली. ही घटना गुरुवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली शहरात गंगो मंदिर ते जानवली ब्रिज पर्यतच्या सर्विस रस्त्यावर हे ऑईल पडले होते.

या ऑईलचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला आहे.दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या एका महिलेला उपचाराकरिता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. दरम्यान या सर्विस रस्त्यावर ऑइल पडल्याने गांगो मंदिर ते जानवली ब्रिज पर्यंतचा सर्विस रस्ता वाहतुकीस तात्पुरता तात्काळ बंद करण्यात आला. सर्विस रस्त्यावर ऑईल पडल्याने रस्ता निसरडा होऊन अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत.

You cannot copy content of this page