कणकवलीत नव्याने अस्तित्वात येणाऱ्या टेंबवाडी रस्त्याचे भूमिपूजन

टेंबवाडीतील रहिवाशांना मिळणार थेट घरापर्यंत रस्ता

कणकवली ता.१६-:* कणकवली शहरातील एस एम हायस्कूल समोरील बाबा भालचंद्र मॉल बिल्डींग ते कणकवली टेंबवाडी जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन तेथील ज्येष्ठ ग्रामस्थ जमीन मालक मंगेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह नगरपंचायतीच्या माध्यमातून या नव्याने अस्तित्वात येणाऱ्या रस्त्याचे काम मंजूर झाले असून, यामुळे कणकवली एस एम हायस्कूल ते टेंबवाडी बोरकर सर घरापर्यंत या मार्गे अर्धा किलोमीटरचा वळसा टाकून बाबा भालचंद्र मॉल बिल्डिंग कडून थेट टेंबवाडी च्या रस्त्याला जाता येणार आहे. या रस्त्यामुळे टेंबवाडी मधील अनेक नागरिकांच्या घरांना थेट रस्त्याची उपलब्ध नसलेली सोय देखील झाल्याने तेथील स्थानिक नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त करण्यात आले.

या रस्त्याचे प्रत्यक्षात काम देखील सुरू करण्यात आले असून, लवकरच हा रस्ता कार्यान्वित होईल असा विश्वास कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी याप्रसंगी व्यक्त केला. आत्माराम राणे व व्यंकटेश सावंत यांच्या पाठपुराव्या तूनच हा रस्ता होत आहे. असेही उद्गार यावेळी श्री नलावडे यांनी काढले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून टेंबवाडी मधील महिलांनी श्री. नलावडे यांचे औक्षण करत व केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेविका मेघा गांगण, मेघा सावंत नगरसेवक रवींद्र गायकवाड, ऍड. विराज भोसले, अभिजीत मुसळे, प्रतीक्षा सावंत, शिशिर परुळेकर, बाळा पाटील, बाळा सावंत, माजी नगरसेवक अभय राणे, माजी नगरसेवक बंडू गांगण, सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत, धनंजय कसवणकर, संजीवनी पवार, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, मंगेश राणे, संतोष राणे, संतोष सावंत,लीलाधर शिवगण ,बिपिन चव्हाण ,अशोक राणे, अशिष सावंत ,अभिजीत सावंत, औदुंबर राणे, सोहम राणे,सुनील सावंत, श्री. मुंडले, दिलिप राणे,रामदास राणे,विनोद मर्गज,शुभम गोवेकर, संजय राणे, व्यंकटेश सावंत आत्माराम राणे, सागर राणे ,ओमकार राणे ,विजय राणे,आदर्श राणे, हर्षद मांडवकर, अमित मांडवकर, संदेश आर्डेकर,सुधाकर राणे, प्रतीक साळगावकर, रामचंद्र राणे, उमेश राणे, प्रमोद सावंत, नंदू वाळके, संजय सावंत, राज नलावडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page