मालवण (प्रतिनिधी) शिवसेना नेते आणि रेल कामगार सेनेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली रेल कामगार सेनेने मध्य रेल्वे परळ कारखाना कॅण्टीन कमिटीवर भगवा फडकवला आहे. कॅण्टीन कमिटीच्या निवडणुकीत रेल कामगार सेनेने पाच पैकी तीन जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे.
परळ येथील कॅण्टीन निवडणुकीत एनआरएमयू सीआरएमएस, एमआरकेएस मनसे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर देव, कार्याध्यक्ष संजय जोशी, संयुक्त सरचिटणीस नरेंद्र शिंदे, महिला आघाडी सरचिटणीस सोनाक्षी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल कामगार सेना व एससी-एसटी असोसिएशन युतीने ५ पैकी ३ उमेदवार निवडून आणले. शैलेश म्हात्रे, (आरकेएस), रितेश बडगुजर (आरकेएस), अक्षय घरपट (एससी-एसटी) है शिवशक्ती- भीमशक्ती पॅनलचे विजयी उमेदवार आहेत. या निवडणुकीत मुंबई विभाग अध्यक्ष नरेश बुरघाटे, उपाध्यक्ष अर्जुन जामखिंडीकर, भरत शर्मा, राजू पाटोळे, चंद्रकांत वनरकर, सूर्यकांत आंबेकर, संजय चिपकर, यशोदा हटवार, सुषमा गुजर, संगीता सोनवणे, परळ युनिटचे अध्यक्ष राजीव सोनवडेकर, संजय अडसूळ, रणजित खिल्लारे, संदेश कदम, विजय सितप, शैलेंद्र रसाळ, महेश प्रजापती, शिवाजी मांढरे, निखिल पाठक, उल्हास तारी, राजू माने, आदित्य सातोसे, अभिजित रणदिवे यांच्यासह रेल कामगार सेनेच्या केंद्रीय कमिटी, मुंबई विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. त्याचबरोबर ऑल इंडिया एससी- एसटीचे अमर वाडते, दीपक संसारे, श्री. वाघमारे, उल्हास पगारे, माता लोखंडे, शांताबाई मस्के, छाया करा, शुभांगी सावंत यांनीही विशेष प्रयत्न केले.
