मनात दृढ निश्चय असेल तर कठीण कार्य ही पार पडणार…

प.पू. काड सिद्धेश्वर स्वामींचे प्रवचनातून अनमोल मार्गदर्शन

दोडामार्ग ता.१५-:* सदृगुरू यांच्या मनात असेल दुढ निश्चय असेल तर होणारे कार्य पार पडणार आत्मा हे एक मोठे सामर्थ आहे.तो खूप काही करु शकतो, जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या नशीबावर परमेश्वराने भोग लिहले आहेत ते भोगावे लागणार ते कुणालाही चुकलेले नाही.प्रत्येकाच्या कर्मानुसार सुख दू:ख हे आले आहे.

विधीवत होणारी घटना घडणार या दिव्यातून प्रत्येकाला जावे लागते प्रभू श्री राम यांचा राज्यभिषेक ठरला असताना त्यांना वनवासात जावे लागले त्यांना देखील या दिव्यातून जावे लागले .त्यामुळे नशीबाचे भोग कुणाला चुकले नाही त्यामुळे अध्यामिक मार्गाने परमेश्वरावर आपल्या गुरुवर श्रध्दा ठेवा असे आवाहन कोल्हापूर कणेरी येथील मठाधिपती प.पू.काडसिध्देश्वर स्वामी यांनी मी आत्मा आहे .या विषयावर प्रवचन देताना केले.

दोडामार्ग तालुका गोवा सावंतवाडी येथील काडसिध्देश्वर सांप्रदाय मंडळी दोडामार्ग यांच्या वतीने सासोली येथे आध्यात्मिक सत्संग आनंद सोहळा सासोली मंदार हाॅल येथे आयोजित केला होता .यावेळी प.पू.काडसिध्देश्वर स्वामी यांनी आपल्या प्रवचनातून शेकडो भक्तांना मार्गदर्शन केले.

You cannot copy content of this page