*सावंतवाडी आणि कणकवली तालुक्यातील हातभट्टी दारूवर स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई

दोन्ही कारवाईत मिळून एकूण ३१ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त*

सिंधूदुर्गनगरी ता १५ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील आजगाव भोमवडी तसेच कणकवली तालुक्यातील साकेडी बोरीची वाडी या दोन ठिकाणी अवैध हातभट्टी दारूवर कारवाई केली आहे यात सुमारे 31 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच दोन व्यक्तींवर महाराष्ट्र दारू बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यात व कणकवली तालुक्यात गावठी हातभट्टी दारू विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार या विभागाने पथके तयार करून या अवैद्य गावठी गूळ हातभट्टीवर कारवाई केली. यात सावंतवाडी तालुक्यातील आजगाव भोमवडी येथील संशयित श्रीमती कारलू कायतान डिसोजा यांच्याकडून 5,220 रुपये किंमतीची काजू गावठी हातभट्टीची 13 लिटर दारू गैरकायदा बिगर परवाना आढळून आली. कणकवली तालुक्यातील साखळी बोरीचीवाडी येथे श्रीमती म्हापसेकर यांच्या येथे छापा टाकला असता श्रीमती म्हापसेकर यांच्याकडे गावठी गुळ हातभट्टी दारूचे भरलेले 180 मिली मापाच्या 32 बॉटल, गोवा बनावटीच्या 180 मिलीच्या 38 बॉटल तसेच गावठी गुळ हातभट्टी दारू गाळण्याच्या उपयोगातील 280 लिटर गुळ नवसागर मिश्रित रसायन असा एकूण 26 हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच श्रीमती म्हापसेकर यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्ह्यात दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत 31 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रामचंद्र शेळके, कृष्णा केसरकर, अनुप खंडे, प्रमोद काळसेकर, चंद्रकांत पालकर, संकेत खाड्ये, महिला अंमलदार प्रतिक्षा कोरगावकर यांनी केली.

You cannot copy content of this page