किर्लोस रामेश्वर सोसायटीवर शिवसेना पुरस्कृत गाव विकास पॅनलचे वर्चस्व

चेअरमनपदी स्वानंद भावे तर व्हाईस चेअरमनपदी श्रीधर गावडे बिनविरोध

कणकवली ता.१४-:* मालवण तालुक्यातील किर्लोस येथील श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर शिवसेना पुरस्कृत गाव विकास पॅनलने वर्चस्व प्राप्त केले असून 11 पैकी 10 जागा शिवसेना पुरस्कृत गाव विकास पॅनलला मिळाल्या असून भाजपला एक जागा देण्यात आली आहे. श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी स्वानंद अरुण भावे यांची तर व्हाईस चेअरमनपदी श्रीधर वसत गावडे यांची निवड झाली आहे. निवडीकरीता अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संस्था कार्यालय किर्लोस येथे संचालक मंडळ सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी येत आहे .नूतन संचालक स्वानंद अरुण भावे , श्रीधर वसंत गावडे , योगेश बाळकृष्ण लाड, जयसिंग अर्जुन वारंग , प्रविण सोमा घाडीगांवकर , सुनिल वसंत लाड, गुरुनाथ दत्तात्रय चव्हाण , सुधीर श्यामसुंदर लाड , नुतन सुनिल घाडीगांवकर , प्रेमलता जनार्दन लाड , रविंद्र गोपाळ किर्लोस्कर उपस्थित होते.यावेळी संस्थेच्या चेअरमनपदी स्वानंद अरुण भावे यांची तर व्हाईस चेअरमनपदी श्रीधर वसत गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजय हिर्लेकर यांनी काम पाहिले. चेअरमनपदी स्वानंद अरुण भावे यांची तर व्हाईस चेअरमनपदी श्रीधर वसत गावडे यांची निवड झाल्यानंतर किर्लोस सरपंच प्रदीप सावंत , उपसरपंच दीपक उर्फ बाबू किर्लोस्कर, पोलीस पाटील किशोर लाड, शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा उद्योजक प्रशांत उर्फ बाबा सावंत , माजी सरपंच पंढरी घाडीगांवकर, किर्लोस शिवसेना शाखाप्रमुख गणेश गावकर, अजित लाड व संस्था सचिव लक्ष्मण घाडीगांवकर यांनी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page