सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांच्या आवाहनाला तरंदळे येथील दोन भावांचा प्रतिसाद…

“त्या” ५ ही पिलांचे स्वीकारले पालकत्व…

सावंतवाडी ता.१३-:* सबनीसवाडा येथील एका भटक्या कुत्रीचा मृत्यू झाल्याने तिची ५ पिल्ले अनाथ झाली होती. याबाबत या पिलांना प्राणी प्रेमींनी आधार द्यावा असे आवाहन माजी शिक्षण आरोग्य सभापती व विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी केले होते.

या आवाहनाला कणकवली तालुक्यातील तरंदळे येथील दोन भावांनी श्रीकांत सावंत आणि लक्ष्मीकांत सावंत यांनी प्रतिसाद दिला असून, त्यांनी या ५ ही पिलांना आसरा देत त्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. या ५ ही पिल्लांना मंगेश तळवणेकर, लक्ष्मण गावकर, नारायण कारिवडेकर, दिनेश साईल, व रोहन साईल यांनी सावंत यांच्या निवासस्थानी नेऊन दिले आहे.

You cannot copy content of this page