श्री देव खंडेश्वर आणि श्री देवी सातेरी भावई चा पुनः प्रतिष्ठापना सोहळा ११ ते १३ मे दरम्यान होणार साजरा…

आंबोली, ता.८: कुंभवडे (चौकुळ) येथे श्री.देव खंडेश्वर आणि श्री देवी सातेरी भावई चा पुनः प्रतिष्ठापना सोहळा ११ मे ते१३ मे रोजी होणार असून या कार्यक्रमासाठी भाविकांनी आणि सर्व लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कुंभवडे गावाने केले आहे.

कुंभवडे, ता.दोडामार्ग (चौकुळ ग्रूप ग्रामपंचायत) येथील गावचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे पुनः बांधणी करण्यात आली आहेत.तसेच या ठिकाणी श्री खंडेश्वर देवाची नवीन मूर्ती पुनः प्रतिष्ठापीत करण्यात येणार आहे.तसेच सातेरी भावई आणि सर्व देवांचा स्थापना सोहळा करण्यात येणार आहे. कलशस्थापन सोहळा करण्यात येणार आहे.

११ मे बुधवारी प्रायच्छित विधी, विधिवत स्त्रियांचे गंगा पूजन,देव जलाधी वास,महाप्रसाद.१२ मे गुरुवारी गणेश पूजन,पुण्याहवाचन, शांतीहोम, वास्तुदेव स्थापना ,मिरवणूक,धार्मिक विधी,महाप्रसाद आणि संध्याकाळी दशावतारी नाटक.शुक्रवारी शंतीपाठ,पुठस्त देवता पूजन, अवर्ण्यचन,सकाळी ८ च्या मुहूर्तावर श्री देव प्रतिष्ठापना,देवता महापूजा,बलिदान,अभिषेक,ब्राह्मण पूजन, श्रेयदान,महानैवेद्य,महाआरती,गाऱ्हाणे,देवदर्शन,तीर्थप्रसाद,महानैवेद्य, ओटी भरणे असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तरी सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन कुंभवडे ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page