संजू परब; मंगळवारी क्वारीवर देणार धडक…
सावंतवाडी ता.०८-:* वेत्ये येथे सुरू असलेल्या क्वारी मुळे तेथील अनेक घरांना तडे गेले असून, याबाबत तक्रार देऊनही महसूल विभागाने अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसून, यामध्ये महसूल विभागाला टक्केवारी मिळत असल्याने ते कारवाई करत नसल्याचा आरोप सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडी येथील आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, त्या क्वारी मधून दिवसाला ५०० डंपर ची वाहतूक होत असून, त्यामागे नक्की कोण सूत्रधार आहे. याबाबतची चौकशी वरिष्ठांकडे करणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित आदी पदाधिकारी उपस्थित होते

