एन सी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव रायफल शूटिंग शिबिर संपन्न …

सावंतवाडी ता.३०-:* एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय तसेच उपरकर शूटिंग रेंज माठेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने एनसीसीच्या विद्यार्थ्यांमधील रायफल ची असलेली भीती दूर करण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांसाठी सराव रायफल शूटिंग शिबिर घेण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना रायफल फायरिंग बाबत मूलभूत माहिती देण्यात आली.

यावेळी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉक्टर प्रसाद नार्वेकर खजिनदार मुकुंद वज़े संचालक गौरांग चिटणीस संचालिका राजश्री टिपणीस उपस्थित होत्या. रायफल शूटिंग शिबिरात एकूण 40 जणांनी सहभाग घेतला होता पिस्टल फायरिंग टेन मीटर, एअर रायफल अशा प्रकारच्या रायफल्सने शूटिंग करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आला सराव शिबिरामध्ये मुलींमधून कॅडेट मानसी शिंदे तर मुलांमधून कॅडेट आयुष पारधी यांना प्रथम क्रमांक देण्यात आला यावेळी सर्व विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता बघावयास मिळाली खजिनदार श्री वझे यांनी अशाच प्रकारची शिबिरे इतर शालेय विद्यार्थ्यांसाठी देखील आयोजित करण्याच्या सूचना केल्या याप्रसंगी उपरकर शुटींग रेंज चे संचालक तथा प्रशिक्षक कांचन उपरकर यांना संस्थेच्या वतीने स्मृतिचिन्ह देण्यात देऊन गौरविण्यात आले. प्रशाळेचे एनसीसी अधिकारी फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले संस्थेचे अध्यक्ष शैलेश पै तथा प्रशाळेचे मुख्याध्यापक एन. पी.मानकर यांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व अशा सहशालेय उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असावा असे पालकांना आवाहन केले.

You cannot copy content of this page